महाराष्ट्राचा भूगोल

महाराष्ट्राचा भूगोल

महाराष्ट्राचा भूगोलप्रश्न क्र. 1) महाराष्ट्राची भूमी कोणत्या प्रमुख अग्निजन्य खडकापासून बनलेली आहे ?
उत्तर - बेसाल्ट

प्रश्न क्र. 2) महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कोणते ?
उत्तर - कळसूबाई शिखर , (उंची : 1664 मी.) सह्याद्री रांगात आहे .

प्रश्न क्र. 3) महाराष्ट्रातील प्रसिद्ध थंड हवेची ठिकाने
उत्तर -माथेरान व महाबळेश्वर .

प्रश्न क्र. 4) बुलढाणा जिल्ह्यातील खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणते ?
उत्तर - लोणार

प्रश्न क्र. 5) लोणार सरोवर कसे निर्माण झाले?
उत्तर - उल्कापातामुळे.

प्रश्न क्र. 6) महाराष्ट्रातील प्रमुख नद्या कोणत्या?
उत्तर - तापी ,गोदावरी, वैनगंगा, वर्धा, भीमा, कृष्णा .

प्रश्न क्र. 7) महाराष्ट्राच्या पूर्वेकडील विदर्भ प्रदेशात कोणते खनिज आढळतात?
उत्तर - लोह व मॅग्निज .

प्रश्न क्र. 8) महाराष्ट्रातील प्रमुख व्यवसाय कोणता ?
उत्तर - शेती .

प्रश्न क्र. 9) महाराष्ट्रातील प्रमुख पिकं कोणती ?
उत्तर - ज्वारी, तांदूळ, गहू.

प्रश्न क्र. 10) महाराष्ट्राची राजधानी कोणती ?
उत्तर - मुंबई .

प्रश्न क्र. 11) महाराष्ट्राची उपराजधानी कोणती ?
उत्तर - नागपूर .

प्रश्न क्र. 12) महाराष्ट्रातील प्रमुख प्रकल्प .
उत्तर - कोयना- वीजकेंद्र, पैठण - जायकवाडी धरण, तारापूर - अणुवीज केंद्र, अरबी समुद्र - बॉम्बे हाय तेल क्षेत्र .

प्रश्न क्र. 13) महाराष्ट्रातील प्रेक्षणीय किल्ले ?
उत्तर - मुरुड जंजिरा, सिंधुदुर्ग, सज्जनगड, छत्रपती शिवरायांचे जन्मघर शिवनेरी, सिंदखेड राजा; रायगड

प्रश्न क्र. 14) महाराष्ट्रातील प्रमुख मराठी साहित्यिक .
उत्तर - वि.वा. शिरवाडकर, वि. स.खांडेकर, पु. ल.देशपांडे .

प्रश्न क्र. 15) महाराष्ट्रातील समाज सुधारक .
उत्तर - राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर .

प्रश्न क्र. 16) महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण कोणते ?
उत्तर - चिखलदरा , विदर्भाचे नंदनवन म्हणून प्रसिद्ध .

प्रश्न क्र. 17) महाराष्ट्रातील अमरावती मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे दुसरे नाव काय ?
उत्तर - ढाकणा कोलकाझ

प्रश्न क्र. 18)महाराष्ट्रातील प्रमुख डोंगररांगा .
उत्तर - धुळे जिल्ह्यातील गाळणा डोंगर , नांदेड जिल्ह्यातील मुदखेड डोंगर, भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील दरेकसा टेकड्या, गडचिरोली जिल्ह्यातील चिरोली टेकड्या, भामरागड व सुरजागड डोंगर, परभणी- नांदेड जिल्ह्याच्या सीमेवरील निर्मल रांगा, नागपूर जिल्ह्यातील गरमसूर डोंगर.

प्रश्न क्र. 19) महाराष्ट्राच्या सातपुड्यातील सर्वोच्च शिखर कोणते ?
उत्तर - बैराट (1177 मी.)अमरावती जिल्ह्यातील गाविलगड टेकड्यात आहे .

प्रश्न क्र. 20) महाराष्ट्र राज्यातील सर्वात लांब नदी ?
उत्तर - गोदावरी .

प्रश्न क्र. 21) भारतातील सर्वात लांब अंतर धावणारी एक्सप्रेस रेल्वे कोणती ?
उत्तर - कन्याकुमारी ते जम्मू-तावी हिमसागर एक्सप्रेस  (3751 कि.मी.) धावणारी रेल्वे आहे .

प्रश्न क्र. 22) महाराष्ट्रातील आदिवासी विकास महामंडळाची स्थापना केव्हा झाली ?
उत्तर - 1972 मध्ये .

प्रश्न क्र. 23) आदिवासी विकासासाठी नवसंजीवनी योजना केव्हा सुरू केली ?
उत्तर - 1 मे 1966 मध्ये .

प्रश्न क्र. 24) आंध्रप्रदेश राज्यास सीमा संलग्न असलेले जिल्हे कोणते ?
उत्तर - गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ व नांदेड

प्रश्न क्र. 25) गुजरात राज्यास सीमा संलग्न असलेले जिल्हे कोणते ?
उत्तर - नंदूरबार, धुळे, नाशिक व ठाणे .

Govc
Govc
Govc

Govc


You Might Also Like

0 comments